सोमेश्वरनगर (करंजेपूल) येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे भव्य उद्घाटन

   

   सोमेश्वरनगर (प्रतिनिधी)

      महाराष्ट्र ग्रामीण बँकेची करंजेपूल शाखा आज मोठ्या उत्साहात व उपस्थितीच्या साक्षीने उद्घाटित करण्यात आली. या प्रसंगी बँकेचे महाव्यवस्थापक श्री. भामरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “महाराष्ट्र ग्रामीण बँक ही संपूर्णपणे शासकीय मालकीची शेड्युल्ड बँक असून अत्याधुनिक CBS प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना सर्व प्रकारच्या आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.”



ते पुढे म्हणाले की, बँकेत NEFT/RTGS, UPI, Mobile Banking, Internet Banking, CTS Clearing, Rupay Debit Card, Platinum ATM Card अशा अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. तसेच विविध आकर्षक ठेव व कर्ज योजनांद्वारे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, नोकरदार वर्ग आणि बचत गटांना आर्थिक मदत पुरवली जाते. पात्र खातेदारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यातही बँक आघाडीवर आहे.


सध्या बँकेच्या महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये जवळपास ७५० शाखा कार्यरत असून, सप्टेंबर २०२५ अखेर एकूण ४२ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठण्यात बँकेला यश आले आहे. करंजेपूल व परिसरातील नागरिकांनी बँकेत खाते उघडून या उत्कृष्ट ग्राहकसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भामरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.


या उद्घाटन समारंभास बँकेच्या पुणे क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. गिरीश चिवटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे, माजी सभापती प्रमोदकाका काकडे, संचालक संग्राम सोरटे, अभिजीत काकडे, ऋषिकेश गायकवाड, डॉ. मनोज खोमणे, सरपंच भाऊसाहेब हुबरे, तसेच संतोष कोंढाळकर, संतोष गायकवाड, शिवाजी शेंडकर, रूपचंद शेंडकर, सुनिलआबा भोसले, स्वप्निल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करंजेपूल शाखेचे व्यवस्थापक श्री. संदीप कानगुडे, कार्यालयीन सहाय्यक प्रतीक डोंबाळे, मयूर लेंढे, सागर जगताप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अजिंक्य धुरगुडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments